Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

प्रतिकुल परिस्थितीवर मात करून एक यशस्वी उद्योजक म्हणुन नावलौकिक मिळवलेले उद्योजक साई पेट्रोल केमिकल चे मालक संतोष कुलकर्णी

आमचे परममित्र प्रेमळ मनमिळाऊ हसतमुख अजातशत्रू दिलदार व्यक्तीमत्व सामाजिक कार्यकर्ते अखिल ब्राम्हण संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष साई पेट्रो केमिकल्स क्लासिक ॲाईल कंपनीचे मालक उद्योजक संतोष कुलकर्णी काका यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा शुन्यातून स्वकर्तृत्वावर आपले विश्र्व निर्माण करून प्रतिकुल परिस्थितीवर मात करून एक यशस्वी उद्योजक म्हणुन नावलौकिक मिळविलेल्या उद्योजक साई पेट्रोल केमिकल चे मालक संतोष कुलकर्णी यांचा जन्म 26 नोव्हेंबर रोजी 1967 साली मुरलीधर व विजया या शेतकरी दाम्पात्यापोठी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बार्शी येथे मामाच्या गावी झाले.बी.ए.शिक्षण पुर्ण झाल्यानंतर 1984 साली राजुरी या गावी येऊन शेती,दुधडेअरी, पोल्ट्रीफार्म, सायकल दुकान असे अनेक व्यवसाय केले.1989 साली त्यांचा विवाह टेंभूर्णी येथील दिनकर देशपांडे यांची कन्या शामल यांच्या बरोबर झाला.विवाह झाल्यानंतर पाच वर्षे अनेक व्यवसाय करुन स्थैर्य प्राप्त झाले.वडीलोपार्जित बारा एकर शेती वडील व भाऊ शेती करत असल्याने आपण वेगळ्या वाटेने जाऊन आपले करिअर करण्याची खुनगाठ मनाशी बांधली व चुलते प्रकाश विठ्ठल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे एका स्पेअरपार्टच्या कंपनीत कामाला सुरुवात केली.गुजरात तीन वर्षे,मध्यप्रदेश तीन वर्षे,कर्नाटक तीन वर्षे कोकण डिव्हीजनमध्ये अकरा वर्ष मार्कटीग मॅनेजर म्हणून काम केले.1995 ते 2000 साली औरंगाबाद येथे आईल कंपनीत मार्केटिंगचे काम केले. मार्केटींगचे काम करत असताना आईल तयार करण्याची माहिती घेऊन सन 2001 ते 2004 पर्यंत ओंरगाबाद येथे आईल विक्रीचे दुकान सुरू केले. चांगला जम बसल्यानंतर सन 2005 ते 2010 या काळामध्ये स्वतची आईल कंपनी सुरू केली. आईलच्या व्यवसायात चांगले यश मिळाल्यानंतर औरंगाबाद येथे आईल कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.औरंगाबाद येथे आईल कंपनीला जागा न मिळाल्याने आपल्या कर्मभूमीत करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक वसाहतीत साई पेट्रो केमिकलच्यावतीने क्लासिक आईल या नावाने ट्रेडमार्क घेऊन आईल प्रोडक्शन सुरू केले.सध्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यात क्लासिक नावाने आईल जात असुन लुना,ट्रक्टर ,कार,जे.सी.बी.जिप, मोटार सायकल, पोकलेन यांना लागणारे आईल स्वत तयार करत असुन याबरोबरच इंजिन आईल , गिअर आईल,4टि इंजिन आईल,फोर्क आईल अशा सर्व प्रकारच्या आईलचे उत्पादन करून विक्री करत आहे.साई पेट्रो केमिकल या नावाने क्लासिक आईल कंपनीची यशस्वीपणे वाटचाल चालू आहे.त्यांच्या या व्यवसायात त्यांचा मुलगा शुभम वडीलांच्या या बरोबर काम करत असुन यशस्वीपणे वाटचाल चालू आहे.उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना एक मुलगा व एक मुलगी असुन सुप्रिया ही विवाहित असून तिचा विवाह अॅड वैभव कुलकर्णी लातुर यांच्या बरोबर झाला असून दोन नातु आहेत. चिरंजीव शुभमचे नुकतेच लग्न झाले असून सुन वैष्णवीचे एम काॅम शिक्षण झाले असुन ती या व्यवसायात चांगली मदत करीत आहे . संतोष काका कुलकर्णी यांच्या वाटचालीत त्यांची धर्मपत्नी शालन यांचे योगदान मोलाचे असुन सांसारिक जीवनात अनेक संकटांचा सामना करुन संसाररुपी प्रंपचाचा गाडा हाकण्याचे काम त्यांनी केल्यामुळे यशस्वी संप्पन आयुष्य जगत आहेत. संतोष काका कुलकर्णी यांना सामाजिक कार्याची विशेष आवड असुन राजुरी गावच्या विकासासाठी ते सदैव कार्यतत्पर असल्याने गावातील विकासकामात त्यांचे योगदान मोलाचे आहे.संतोष काका कुलकर्णी यांचा स्वभाव मनमिळाऊ प्रेमळ धार्मिक दानशूर वृत्ती असल्याने सर्व पक्षांचे कार्यकर्ते गटाचे, नेत्याबरोबर त्यांचे मैत्रीचे नाते असुन जिव्हाळ्याचे संबंध आहेत.अजातशत्रु व्यक्तिमत्त्व असलेले काका सर्वाच्या सुख दुःखात सहभागी होऊन संकटात सापडलेल्याना मदत करण्यासाठी सदैव कार्यतत्पर असल्याने संतोष काका कुलकर्णी सर्वांचे आवडते गळ्यातील ताईत बनले आहेत.चांगल्या विचारांच्या माणसाच्या सहवासात राहिल्याने आपले चांगले होते.साईबाबावर संतोष काका कुलकर्णी यांची निंतात श्रध्दा असुन जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात करून साईबाबांच्या कृपेने श्रध्दा व सबुरीने काम चालू आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group