करमाळा

दहिगाव उपसा सिंचन बंदनलिकेचे काम 30 मे रोजी चालू न झाल्यास 5 जून रोजी विधानभवनावर घंटानाद आंदोलन करणार -भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सिंचन बंदनलिकेचे काम 30 मे रोजी सुरू न झाल्यास पाईप जाळणारे विरुद्ध कारवाई न झाल्यास 5 जून रोजी विधानभवनावर घंटानाद आंदोलन करण्यात येईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी व्यक्त केले. दहिगाव उपसा सिंचन बंदनलिकेचे पाईपलाईनचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी पाईप जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांच्या नेतृतत्वाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा व समविचारी सर्व पक्षांच्या‌‌ सहभागाने अर्जुन नगर फाटा ता .करमाळा येथे ‌ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दहीगाव उपसा सिंचनचे पाणी बंधनलिकेतून देण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे कालावधीमध्ये ही योजना मंजूर झाली .सदर 287 किलोमीटर असणाऱ्या या बंद पाईपलाईन मध्ये 57 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पूर्ण करण्यासाठी विरोधासाठी विरोध म्हणून पाईपलाईन बंद पाडण्याचे काम विरोधी गटाकडून केले जात आहे वास्तविक पाहता दहिगाव उपसा सिंचन योजना ही सर्वसामान्य शेतकऱ्याची जीवनदायी असून हे काम पूर्ण झाल्यास लाभ क्षेत्रातील 24 गावे समृद्ध होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी भरत भाऊ अवताडे गणेश चिवटे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे, शितल शिरसागर विवेक येवले डॉक्टर विकास वीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
करमाळा तालुक्यातील विकासा कामांच्या आड आम्ही येणार नाहीत  असे विधान त्यांनी केले होते.आता मात्र बंद नलिकेतून पाणी नेल्यास पर्क्युलेशन होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक पाहता ज्यावेळेस बंधनलिकेचे काम सुरू झाले होते त्यावेळेसच त्यांनी या गोष्टीला विरोध करून सदर बंद नलिका योजना रद्द करण्याची मागणी करणे गरजेचे होते. आम्हाला पाणी हवे आहे कुणालाही आमचा राजकारणासाठी विरोध नाही. फक्त आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे म्हणजे आमचा भाग सुजलाम सुफलाम होईल हीच आमची खरी मागणी आहे.
त्यामुळे संबंधित काम सुरू करण्यासाठी आमचे नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या हक्काच्या मागणीसाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केले असून पोलीस प्रशासनाचेही आम्हाला मोठे सहकार्य लाभले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 30 मे पर्यंत संबंधित सुरू करणार असल्याचे दहिगाव उपसा सिंचन चे उपअभियंता संजय राजगुरू यांनी लेखी आश्वासन दिले आहे.पाईप जाळणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन आम्हाला दिले असल्याने आंदोलन स्थगित करत असल्याचे भरत भाऊ अवताडे यांनी सांगितले आहे.अर्जुन नगर फाटा येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलन शांततेचे शांततेत संपन्न झाले पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब चो बंदोबस्त ठेवला होता. 30 मे पर्यंत सदर आश्वासन पूर्ण न झाल्यास 5 जून रोजी विधानभवनावर घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे त्यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!