Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील ग्रामीण मार्गाच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून 3 कोटी 35 लक्ष निधीची तरतूद … आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांची सुधारणा करणे मजबुतीकरण करणे यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या 2022 – 23 मधून रस्ते विकास व मजबुतीकरण करणे या लेखा शीर्षाखाली 3 कोटी 35 लक्ष असा भरून निधी मंजूर झाला असून या निधीमधून ग्रामीण भागातील रस्त्यांचा मूलभूत प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
या निधीमधून कुंभारगाव ते घरतवाडी ग्रामीण मार्ग 5 ,दिवेगव्हाण ते कुंभारगाव रस्ता ग्रामीण मार्ग 13 , पोफळज ते सोगाव पूर्व रस्ता ग्रामीण मार्ग ७९ ,कोर्टी ते हुलगेवाडी रस्ता ग्रामीण मार्ग 4,सौंदे ते गावडे वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग 176 , सांगवी तळे वस्ती कोरे वस्ती ते सांगवी नंबर 2 रस्ता ग्रामीण मार्ग 169 ,उमरड ते झरे रस्ता ग्रामीण मार्ग 20, वाघाची वाडी ते जिल्हा हद्द वाणीचिंचोली रस्ता ग्रामीण मार्ग 33 ,रामवाडी ते वारगड वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग 51 , लव्हे ते कोंढेज रस्ता ग्रामीण मार्ग 59, हिसरे सालसे यमाई मंदिर रस्ता ग्रामीण मार्ग 90, देवळाली ते बादल वस्ती ते इजिमा 6 रस्ता ग्रामीण मार्ग 142, जेऊरवाडी शिरसवाडी ते जेऊरवाडी रस्ता ग्रामीण मार्ग 150 , वांगी नंबर 2 ते तकिक वस्ती ते राज्य मार्ग 125 रस्ता ग्रामीण मार्ग 153 , बिचितकर वस्ती नंबर 1 बोगदा रस्ता ग्रामीण मार्ग 188 , अंजनडोह ते घरकुल रस्ता ग्रामीण मार्ग 207 या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर असून वीट ते देवळाली रस्ता ग्रामीण मार्ग 22 – 30 लक्ष , पोंधवडी ते उमरड रस्ता ग्रामीण मार्ग 272 – 30 लक्ष, खातगाव, गुळवे वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग – 19 लक्ष याप्रमाणे ग्रामीण मार्गाच्या सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 39 लक्ष निधी मंजूर झालेला आहे.
इतर जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी 95 लक्ष निधी मंजूर आहे यामध्ये उमरड इजीमा 2, फिसरे हिसरे कोळगाव रस्ता, देवळाली पांडे अर्जुननगर रस्ता, सौंद ते गुळसडी देवळाली रस्ता, सांगवी प्रमुख राज्य मार्ग 8 ते प्रमुख जिल्हा मार्ग 12 ते सातवली या रस्त्यांसाठी प्रत्येकी 15 लाख तसेच पाडळी ते जिल्हा हद्द रस्ता 19 – 10 लक्ष ,प्रतिमा 5 ते दहीखिंडी ते करंजे रस्ता – 10 लक्ष असा इतर जिल्हा मार्गांच्या सुधारण्यासाठी 95 लक्ष निधी मंजूर झालेला असून ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांचे सूचनेनुसार 3 कोटी 35 लक्ष असा भरीव निधी मंजूर झालेला आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group