ओम महिला मंडळाच्यावतीने स्नेहालय स्कूलचे जयंत दळवी सौ. धनश्री दळवी यांना ज्योती सावित्री सन्मान पुरस्कार.
करमाळा प्रतिनिधी
ओम महिला कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांचे अंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. मैतरणी गं मैतरणी नारी सन्मान पुरस्कार देण्यात येत असतो ८ मार्च महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्यरत आणि सेवेत असणाऱ्या मान्यवर महिलांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी देत आहेत यावर्षी ज्योती सावित्री हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या दांम्पत्य ज्योती सावित्री सन्मान पुरस्कार स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी व मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांना दिला आहे .केमिस्ट भवन येथे संपन्न झाला आहे.
तू समाजातील तळागाळातील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा दे मी तुझ्या पाठीशी आहे अशी फूल्यांची विचारधारा जपणारं हे जोडप तसेच महिलांसाठी विविध वेशभूषा सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे . यावेळी
गिरिजा मस्के(API), शितल करेपाटील(सामाजिक कार्यकर्त्या), डॉ कविता कांबळे, डॉ वर्षा करंजकर, डॉ,अपर्णा भोसले यांच्या उपस्थितीत हा गौरवसोहळा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ओम मंडाळाच्या अध्यक्षा अंजली श्रीवास्तव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
……………….
महिला दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी असे पुरस्कार देऊन आम्ही महिलांचा व संस्थांचा सन्मान करत आहोत – अंजली राठोड श्रीवास्तव, अध्यक्षा ओम मंडळ,सामाजिक कार्यकर्त्या
………………
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आगामी काळात देशाचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनमोल असे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून आम्ही सर्व स्टाफ प्रयत्न करत आहोत याची दखल घेऊन आज आमचा सन्मान केल्या त्या बद्दल ओम मंडाळाचे आम्ही ऋणी आहोत – धनश्री दळवी , मुख्याध्यापिका स्नेहालय स्कूल,करमाळा
