सिद्धार्थ व्यायाम शाळा जिल्ह्यात नाव कमवणार-नागेश कांबळे
करमाळा प्रतिनिधी
गेली तीस वर्षापासून सिद्धार्थ व्यायाम शाळेचा प्रश्न प्रलंबित होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी 30 लाख रुपये मंजूर करून दिले व आज या कामाची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने या या कृतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता दिसून आली असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नागेश दादा कांबळे यांनी व्यक्त केले.आज नियोजन मंडळाचे निधीतून सिद्धार्थ व्यायामशाळेच्या नूतनीकरणाच्या कामात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होतेयावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल दादा कानगुडे शिवसेना शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंतयुवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे तालुकाप्रमुख नवनाथ गुंडजेऊर शहर प्रमुख बाळासाहेब करचेमहिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई शिंदे करमाळा महिला शहरप्रमुख कीर्ती स्वामीरंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण सोशल मीडिया प्रमुख जयराज चिवटेदलित सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसलेआरपीआय नेते नितीन दादा कांबळेवंचित आघाडीचे दादासाहेब लोंढेशिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे भोसले हॉस्पिटलचे समन्वयक संजय कांबळे प्रफुल्ल दामोदरआधी दलित चळवळीतले कार्यकर्ते कंत्राटदार किशोर भगत उपस्थित होते.यावेळी बोलताना नागेश कांबळे म्हणाले की दलित वस्तीतला निधी इतर विभागात खर्च करण्याची प्रथा करमाळा तालुक्यात पडली असून ही प्रथम मोडून मोडीत काढण्याची सुरुवात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहेयपुढे करमाळा तालुका व नगरपालिका क्षेत्रात दलित वस्तीतील निधी जर इतर विभागात वापरला तर त्यांचे विरोधात कठोर कारवाई करून वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची वेळ आली तरी पाठीमागे पाहणार नाही असा इशारा नागेश कांबळे यांनी दिला
+++
सिद्धार्थ व्यायाम शेजारीच डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका इमारत उभा करावी जेणेकरून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या दलित समाजातील विद्यार्थ्यांना एक स्थान निर्माण होईल यासाठी जिल्हाप्रमुख महेशचिवटे यांनी प्रयत्न करावा असे आव्हान दादा लोंढे यांनी केले
