करमाळा माढा पोलीस पाटील निवड प्रक्रिया चौकशी करून नेमणुका करण्यात येईल जिल्हाधिकारी यांची देविदास साळुंखे यांच्यासह शिष्टमंडळाला आश्वासन
करमाळा प्रतिनिधी करमाळा /माढा तालुक्यातील पोलीस पाटील निवड प्रक्रियेला अखेर दुसऱ्यांदा स्थगिती जिल्हाधिकारी सोलापूर यांनी चौकशी अधिकारी नेमून सुनावणी घेऊन चौकशी झाल्याशिवाय पोलीस पाटील नेमणूक आदेश न देणेची अट केली मान्य केली आहे अशी माहिती श्री देविदास आप्पा साळुंके माहिती अधिकार कार्यकर्ता कोंढार चिंचोली यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की करमाळा /माढा पोलीस पाटील निवड यादी मा प्रांतधिकारी कुर्डुवाडी यांनी प्रसिद्ध केली. व सदर निवड केलेल्या उमेदवार यांना नियुक्तीचे आदेश देणेकामी काल दि 15/3/2024 रोजी कुर्डुवाडी येथे बोलविले होते, दरम्यानच्या काळात कालच माहिती अधिकार कार्यकर्ते श्री देविदास साळुंके यांचे नेतृवाखाली करमाळा /माढा तालुक्यातील शिस्टमंडळात श्री चेतन गलांडे, कोंढार चिंचोली, श्री शहाबुद्दीन सय्यद, सावडी, श्री ज्ञानेश्वर देशमुख, कव्हे, सौ पूनम कोयले, शिडशिंगे. सौ वैष्णवी काळे, सुर्ली, युवराज पाटील सुर्ली, अशोक भानवसे, सुर्ली, देविदास साळुंके कोंढार चिंचोली, बबन पाटील, शिंगेवाडी, सौ प्रियांका पाटील, शिंगेवाडी, मदन पाटील पिंपळवाडी, सुरेश पाटील मा पोलीस पाटील संघटना राज्य, श्री भाऊसाहेब कोयले, शिडशिंगे, निखिल शिडशिंगे इत्यादिनी मा कुमार आशीर्वाद साहेब यांची प्रत्यक्ष सोलापूर येथे जाऊन लेखी निवेदन दिले व सदर पोलीस निवड प्रक्रिया ही चुकीची असुन जाहीरनामाचं चुकीचा काढला असून त्यात त्यांनी अट क्र 19 यात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, गुण प्रसिद्ध करणार नाही इथंच खोटं आहे, परीक्षार्थी यांचेवर अन्याय आहे, शिवाय परीक्षार्थी यांना कार्बन कॉपी देणे गरजेचे असतानी त्यांनी अटी/ शर्थी मध्ये त्याचा उल्लेख नाही, म्हणून परीक्षा पारदर्शी झाली नाही हे जिल्हाधिकारी साहेब यांचे निदर्शनास श्री देविदास साळुंके व सर्व उमेदवार यांनी निदर्शनास आणून जो पर्यंत आपण सदर आजच्या पोलीस पाटील पदाच्या नियुक्ती आदेश देनेचे स्थगित करीत नाही व तक्रारीची योग्य दखल घेत नाही. तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा पवित्रा सर्वानी घेतला व शेवटी श्री साळुंके व सर्व उमेदवार यांना जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांनी आर डी शी मा कुंभार मॅडम यांचेकडे पाठविले या विषयावर त्यांचेशी चर्चा करा असे सांगितले व त्या शिष्ट मंडळाला कुंभार मॅडम निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदर पोलीस पाटील करमाळा/ माढा नियुक्ती पत्र देणेस स्थगिती देऊन चौकशी करून सुनावणी घेऊन सर्वांचे मत जाणून घेईपर्यंत स्थागित करीत असल्याचे सांगितले व सदर शिष्ट मंडळ हे निवेदन व सर्वांच्या लेखी तक्रारी देऊन माघारी आले. तशेच या निवड प्रक्रिया बाबत तक्रार घेऊन भोगेवाडीच्या ता माढा येथील सौ सुप्रियाताई बाळासाहेब पाटील यांनी पुणे येथे महसूल आयुक्त श्री पुलकुंडवर साहेब यांना भेट घेणेकामी चांगलेच धारेवर धरले, त्यांना सदर साहेब भेट टाळत होते, सदर महिलेने भेटीसाठी चिठी दिली असता श्री पुलकुंडवर साहेब यांनी त्यांना भेट नाकारली असता साहेबांनी त्यांच्या ऑफिस मधील शिपायास सांगून करमाळा / माढा पोलीस पाटील निवडी संदर्भातील तक्रारदारांना माझेकडे पाठवू नका असे सांगितल्याने तक्रारदार महिलेनी भेटीचा आग्रह धरला शेवटी साहेबांनी भेट दिली व या विषयावर पडदा पडला त्या सुप्रिया पाटील महिलेचे योगदान हे खरोखरचं कौतुकास्पद आहे या पोलीस पाटील निवड प्रकीया रद्द करणेकामी व स्थागिती घेणेकामी संबंधितना प्रतिवादी करून मा उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करणार आहे असे श्री देविदास आप्पा साळुंके यांनी सांगितले सद्या स्थगिती मिळाल्यामुळे पडदा पडला असून आजच लोकसभेची आचार संहिता चालू होत असुन 3महिने नियुक्ती आदेश देता येणार नाहीत तेव्हा आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत असे साळुंके यांनी सांगितले. व करमाळा व माढा तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या उमेदवारावर अन्याय झालेला आहे अशा उमेदवारांनी श्री देविदास आप्पा साळुंखे यांचा मोबाईल नंबर 7083942563 या क्रमांकावर आवश्यक त्या कागदपत्रा सह संपर्क साधावा असे आवाहन केलेले आहे.
