जिद्द चिकाटी, परिश्रम, योग्य संस्कार,व शिक्षण मिळाल्यास यश निश्चित असुन कु निकीता बागल हिने मिळवलेले यश कौतुकास्पद – प्राध्यापक रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी, परिश्रम, योग्य संस्कार व शिक्षण मिळाल्यास यश निश्चीत असुन कु. निकिता रामदास बागल तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी त्याला योग्य संस्कार व शिक्षण दिले तर नक्कीच कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येते .कु .निकिता रामदास बागल हिने मिळवलेली यश नक्कीच युवा पिढीसाठी प्रेरणादायी असुन भावी पिढीने तिचा आदर्श घेऊन आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यतत्पर होण्याची आवाहन त्यांनी केले. दत्तकला शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या पोमलवाडीची कु. निकिता रामदास बागल हिने इ. ०८ वी. ते बी. फार्म पर्यंत दत्तकला शिक्षण संस्था येथे शिक्षण घेतले असून, उच्च अधिकारी होण्याची तिचे ध्येय व स्वप्न होते ते तिने जिद्द, चिकाटी, परिश्रम सातत्य याच्या जोरावर यश मिळवले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकारी म्हणुन तिने यश मिळवलेले आहे . तिच्या या यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर दत्तकला शिक्षण संस्था सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
