करमाळा बाजार समितीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
*
करमाळा प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालयीन इमारतीच्या प्रांगणामध्ये बाजार समितीचे उपसभापती प्रतिनिधी , गटसचिवांचे मार्गदर्शक नेते श्री बबनराव मेहेर यांच्या शुभहस्ते ध्वज वंदन करण्यात आले .या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व बाजार समितीचे संस्थापक माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कै . नामदेवरावजी जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर ,डीसीसी बँकेचे शाखाधिकारी अभयसिंह आवटे यांचे सह बाजार समिती व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .


