जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ करमाळा तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाकडून चार उमेदवार मैदानात
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने करमाळा तालुक्यातून चार उमेदवार जाहीर करून निवडणूक रिंगणात दमदार आव्हान उभे केले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंगद देवकते यांच्या नेतृत्वाखाली ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत — पंचायत समिती हिसरे गटातून अंगद विश्वनाथ देवकते, जिल्हा परिषद पांडे गटातून सौ. गुणाबाई विष्णू रंदवे, पंचायत समिती कोर्टी व केत्तूर गटातून अँड. जमिर कलिंदर शेख हे निवडणूक लढवत आहेत.
या उमेदवारीमुळे करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी, मजूर, महिला, युवक व वंचित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका पक्षाने मांडली आहे. आगामी काळात विकास आराखडा व लोकाभिमुख कार्यक्रम मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अंगद देवकते यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या या उमेदवारीमुळे निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.


