Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

नववर्षाचे नवीन संकल्प करून उत्साहाने स्वागत करूया मा. आ . जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी गतवर्षात संपूर्ण जगाला कोरोना महामारीच्या संकटाला तोंड द्यावे लागले . अतिशय भयावह परिस्थीती निर्माण झाली होती. गोर-गरिबांसह सर्वांनाच या संकटाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फटका बसला . कित्येकांचे संसार उघड्यावर पडले आहेत . अशी परिस्थिती कधीच कोणावर नंतर येऊ नये असे मला वाटते . यातून आपण सावरत नव्या वर्षाचे नवे संकल्प करून पुन्हा नव्या जोमाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करुयात . झाले – गेले विसरून जावुन आपापसातले वैर , मतभेद विसरून नव्या उमेदीनं नवीन वर्षात म्हणजे २०२२ मध्ये पदार्पण करूयात . आज पर्यंत देशभक्त कै नामदेवराव जगताप साहेबांपासुन राजकारण व समाजकारणातून आपली सेवा करण्याचे भाग्य मिळाले आहे . तालुक्यासाठी अनेक ठोस विकास कामे उजनी धरण , मांगी तलाव , सिना- कोळेगाव प्रकल्प , कुटीर रुग्णालय , दहिगाव उपसा सिंचन , शहरासाठीची पाणी पुरवणा योजना , गावोगावी वीज जोडणी , सबस्टेशन्स , सभागृहे, मंदिरे व त्यांचे जिर्णोध्दार , रस्ते, बंधारे , मार्केट कमिटी , शैक्षणिक संस्था ,जिल्हा बँके या व अशा अनेक विकास कामांच्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जगताप गटाच्या माध्यमातून न्याय देता आला अन् पूढे ही हा वसा असाच चालु राहील आपले आशिर्वाद माझ्या सोबत आहेत . राजकारणात चढ – उतार येतच असतात. तरीही न डगमगता आपण अविरत जनतेच्या सेवेचा विडा उचलला आहे . तालुक्यातील कोणत्याही अडी अडचणी सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणुन कधी ही हाक द्या आपण त्या सोडवण्या साठी कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन करत नवीन वर्षाच्या सर्व तालुका वासियांना जगताप गटाच्या वतीने शुभेच्छा दिल्या .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group