शासनाने लग्नसमारंभासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची बाळासाहेब होसिंग यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने 24 डिसेंबर पासून लावण्यात आलेल्या निर्बंधात सुट देऊन, निर्बंध थोडे शिथिल करण्यात यावे अशी मागणी भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार लग्न समारंभ साठी पन्नास (50) व्यक्ती तसेच अंत्यसंस्कारासाठी वीस (20) व्यक्तींचा नियम लागू केला आहे या नियमांमध्ये थोडीशी शिथिलता देऊन लग्नसमारंभासाठी दोनशे (200) व्यक्ती तसेच अंत्यसंस्कारासाठी किमान पन्नास (50) व्यक्ती या पद्धतीने परवानगी द्यावीअशी मागणी त्यांनी केली आहे.लग्न समारंभाचे बाबतीत बोलायचं झाल्यास कोरोनामुळे एक तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे यामध्ये आता कुठे थोडे बरे दिवस आले असताना शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून शासनाने डेकोरेशन वाले, आचारी, घोडेवाले, बँड, कॅटर्स व इतर अशा पद्धतीने पाहिल्यास किमान 200 जणांसाठी तरी परवानगी द्यावी तर अंत्यसंस्कार विधी बाबत वीस (20) एवजी पन्नास (50) व्यक्तींना परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
