करमाळाकृषीसकारात्मक

गुळसडीची सुंदर जीवनची केळी दुबईला रवाना युवा तरुणांची यशोगाथा केळीला मिळाला 27.50 रूपयांचा विक्रमी भाव

करमाळा प्रतिनिधी सुंदर जीवन कॅटल फिडसचे मालक राजुकाका शियाळ यांचे चिंरजीव सुचीत शियाळ त्यांचे युवक सहकारी मित्र सतिश बागल शंकर क्षिरसागर या तरुण युवकांनी गुळसडी येथील उजाळ माळरानावर केळीची बाग फुलवली असुन त्यांच्या केळीला 27 रु 50 पैसे भाव मिळाला असुन करमाळा तालुक्यातील केळी उत्पादनात विक्रमी भाव मिळवला असुन तरुण शेतकऱ्यांच्या डोळयात अंजण घालण्याचे काम केले आहे.त्यांनी उत्पादीत केलेली केळी वंडर या कंपनीने खरेदी करून दुबईला रवाना झाली आहेत. आजची पिढी म्हणते शेती परवडत नाही शेती म्हणजे तोटयाचा व्यवसाय आहे.शेती करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय केलेला बरा अशी समजुत असल्यामुळे तरुण वर्ग शेती करण्याकडे धजावत नाही.अशा परिस्थितीत जिद्द चिकाटी,परिश्रम घेऊन शेती आधुनिक पध्दतीने केल्यास निश्चित यश मिळते याचे उत्तम उदाहरण असुन तरुण युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे वळुन याची प्रेरणा घेऊन आधुनिक पध्दतीने शेती करुन आपले सुंदर जीवन समृध्द करावे हिच शिकवण या तरुण शेतकऱ्यांनी दिली आहे.त्यांच्या या यशाबद्दल मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे, अनिल पाटील,दत्तात्रय पुंडे, नगरसेवक महादेव फंड, डाॅ.महेशचंद्र वीर, उद्योजक संदीप पवार,युवा नेते अमोल परदेशी,पत्रकार दिनेश मडके,संदिप चुंग, राहुल यादव नामदेव फंड ,कल्याण फंड, दत्तात्रय अडसुळ, सोमनाथ क्षिरसागर,महेश गवळी नागनाथ भंडारे,पिंटु भंडारे,नाना भंडारे, महावीर कळसे,ज्ञानेश्वर कळसे,पांडुरंग कळसे,संतोष कळसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group