कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंतीनिमित्त१ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा (प.प्र.) हमाल पंचायतचे संस्थापक/अध्यक्ष, कामगार नेते, आदिनाथ साखर कारखाना माजी संचालक ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अभिवादन पुष्पांजली अर्पण सोहळा गुरूवार दि.१ मे २०२५ रोजी हमाल भवन, मार्केट यार्ड, पोथरनाका येथे सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर आरोग्य शिबीर, चारा वाटप, फळे वाटप कार्यक्रम सकाळी दहा ते एक यावेळेत होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरीकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे; असे आवाहन करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.


