नेरले सोसायटी मतदार यादी प्रसिद्ध न करता निवडणूक जाहीर करणे सभासद कमी व बोगस समाविष्ट करण्याबाबत, आठ दिवसात कारवाई न केल्यास उपोषण करणार -माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पाटील
करमाळा प्रतिनिधी नेरले सोसायटी मतदार यादी प्रसिद्ध न करता निवडणूक जाहीर करणे,सभासद कमी व बोगस समाविष्ट करणे, आठ दिवसात कारवाई न केल्यास उपोषण करणार असल्याची मागणी माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाचा असे म्हटले आहे कि नेरले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पूर्वी प्रारूप व अंतिम यादी प्रसिद्ध न करताच प्रसिद्ध केल्याची बनावट कागदपत्रे बनवून सचिव व अधिकारी कर्मचारी यांनी संगणमताने निवडणूक प्रोग्राम जाहीर केला.सभासद यादीमध्ये नियमबाह्य धाराशिव जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नागरिकांचा समावेश केला आहे व गावातील नियमानुसार 30 वर्षापासून असणारे 100 ते 125 सभासद कमी करून लाखो रुपये सभासद रकमेचा चा अपहार केला.सचिव सदाशिव पांडुरंग पाटील पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर स्वतःचे बंधूचे व कुटुंबीयांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली आहेत.त्या संदर्भात आम्ही दोन वर्षापासून संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करून न्याय व कागदपत्रे मागत आहोत.न्याय देखील नाही व कागदपत्रे देखील दोन वर्षापासून मिळत नाही.यासाठी सहाय्यक निबंधक व वरिष्ठांकडे अनेक तक्रारी अर्ज करून देखील याची दखल घेतली नाही.त्यामुळे सचिव श्री.सदाशिव पांडुरंग पाटील,दैवशाला सदाशिव पाटील,गणेश पांडुरंग पाटील,पूजा गणेश पाटील,खालील शेटे,सहाय्यक निबंधक श्रीमती रतन महावीर बोलवाडे,असिस्टंट सहाय्यक निबंधक श्री उमेश हरिचंद्र बेंढारी,कर्मचारी श्रीमती एस के मुंडे नऊ जणांनी संघटितपणे,सभासद कमी करणे,सभासद रकमेच्या अपहार करणे,बोगस सभासद वाढविणे,यादी प्रसिद्ध न करता प्रसिद्ध केल्याचे खोटे दाखवून निवडणूक जाहीर करणे,या दोषींवर कारवाई करणे योग्य असताना करण्यास दिरंगाई लावणे,मागितलेली माहिती न देणे.ही संघटित गुन्हेगारी आहे.यांच्यावर आठ दिवसाच्या योग्य ती कार्यवाही न केल्यास व मागितलेली माहिती न दिल्यास दि-05/05/2025 रोजी आमरण उपोषण सहाय्यक निबंधक करमाळा यांच्या कक्षात सुरू करणार असल्याची माहिती नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री.औदुंबरराजे भोसले यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे.डोक्याला मार लागून कवटी फुटली आहे.त्यामुळे मला फिटचा त्रास आहे.डॉ वळसंकर व डॉ भुतडा सोलापूर यांचे प्रत्येक दिवशी तीन वेळेस औषधे चालू आहेत.या उपोषणामुळे माझ्या जीवितास धोका झाल्यास हीच माझी फिर्याद समजून सदर नऊ जण व इतर या प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.


