Uncategorized

पुण्यातील MNC मध्ये अभिजीत जायभाय यांची साऊथ कोरिया प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने साऊथ कोरिया येथील महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अभिजीत मच्छिंद्र जायभाय (रा. लिंबेवाडी, ता. करमाळा) यांची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.
या प्रकल्पांतर्गत जायभाय भारतीय टीमचे नेतृत्व करत पॅकेजिंग मशीनच्या प्रोटोटाइप बिल्डिंगसाठी जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तज्ज्ञांची टीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
अभिजीत जायभाय यांना आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचा मोठा अनुभव असून त्यांनी यापूर्वी स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि चीन या देशांमध्ये SAP तसेच लीन मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांच्या या अनुभवाचा कंपनीला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण आदिनाथ कारखाना परिसरात झाले असून माध्यमिक शिक्षण लोकमान्य टिळक विद्यालय, कराड येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून अभियांत्रिकी पदवी संपादन केली.
ग्रामीण भागातून शिक्षण घेत जागतिक स्तरावर आपली छाप पाडणाऱ्या अभिजीत जायभाय यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!