दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ माया झोळ मॅडम यांचा ‘मकाई’साठी अर्ज दाखल
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व माया झोळ यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार जाधव यांच्याकडे दाखल केला आहे.
प्रा. झोळ यांनी पारेवाडी गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर माया झोळ यांनी पारेवाडी व महिला मतदार संघातून असे दोन अर्ज दाखल केले आहे. यावेळी मकाईचे मा. संचालक सुभाष शिंदे, हरिदास डांगे, शेतकरी संघटनेचे झोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
