Uncategorized

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा – प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६ रोजी करण्यात येणारे निदर्शन आंदोलन मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर स्थगित केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी दिली आहे.
मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या सर्व समस्यांचे निराकरण एक महिन्याच्या आत केले जाईल तसेच उद्याचे आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली आहे.
एक महिन्यानंतर या समस्या सोडवल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा वैभवराजे जगताप यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!