भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या वतीने करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ व भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अथर्व मंगल कार्यालय श्रीदेवीचामाळ, करमाळा येथे झालेल्या या कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या संबोधनाचे प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर आयोजित विकसित भारत संकल्प सभेमध्ये उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकसित भारताच्या संकल्पाची सामूहिक शपथ घेतली.
त्यानंतर ‘सेवा ज्योती अभियानाचे’ मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करत सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख व आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले. त्यांनी विकसित भारताच्या संकल्पासाठी संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी करमाळा तालुक्यातील पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मा. रणजीतभैया शिंदे, जिल्हा परिषद गटनेते रश्मीदिदी बागल, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, माढा पंचायत समितीचे सभापती पंडितकाका देशमुख, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजाताई ढेरे, सांगोला पंचायत समितीच्या सभापती पुनमताई इंगवले, जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपालीताई लठ्ठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरजाताई बोबडे
तसेच सोलापूर ग्रामीण पश्चिम मधील सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा येथे आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या संघटनात्मक एकजुटीचे आणि विविध सेवा उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाचे दर्शन घडले. ‘सेवा, संकल्प आणि विकसित भारत’ या भावनेतून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


