चव्हाण महाविद्यालयामध्ये हरितक्रांतीचा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्वदेशी पिके आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक २९/०३/२०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने *इफेक्टस् ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन ऑन इंडिजिनस क्रॉप्स अँन्ड इट्स् इंपॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी वुईथ इट्स् हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड* या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तुत चर्चासत्रासाठी बीजभाषक म्हणून राणी चनम्मा युनिव्हर्सिटी, विजापूर येथील प्रा. डॉ. चंद्रकांत कोलीगुडे हे उपस्थित राहणार असून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा, जि. रत्नागिरी येथील अर्थशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ. काशिनाथ चव्हाण तसेच ए. एस्. पी. कॉलेज, देवरुख, जि. रत्नागिरी येथील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. सरदार पाटील हे विषय तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.या चर्चा सत्रामध्ये देशातील अनेक राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक शोधनिबंध सादर करणार आहेत.
सदर चर्चासत्रास उद्घाटक म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे उपस्थित राहणार असून विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, संस्थेचे विश्वस्त लेफ्टनंट प्रा. संभाजी किर्दाक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी सदर चर्चासत्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिक्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन चर्चासत्राचे समन्वयक प्रा. कृष्णा कांबळे, प्रा. सरला चव्हाण आणि प्रा. डॉ. विजया गायकवाड यांनी केले आहे.
