Wednesday, April 23, 2025
Latest:
Uncategorized

महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना युवा सेनेच्या वतीने खाजगी व बँकेकडून बळजबरीने होणारी वसुली थांबवण्यासाठी निवेदन

करमाळा प्रतिनिधी
शासकीय विश्रामगृह येथे युवा सेना करमाळा यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये करमाळा तालूक्यात खाजगी फायनान्स व बॅंका यांच्या वतीने कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावत असुन जनतेला मानसीक त्रास देत आहेत जवळ पास तीन ते चार महीने होत आले संपूर्ण लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व काम धंदे बंद आहेत व शासनाचा सुध्दा सक्त आदेश आहे की बळ जबरी व तगादा हप्त्यासाठी लावु नये तरी पण काही शेतकऱ्याचे ट्रॅकटर लोन असुन त्या शेतकऱ्यांनी हप्ते न भरल्यास ट्रॅकटर ओढून नेण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी आपण राज्याचे गृह राज्यमंत्री असुन शेतकऱ्यांची परिस्थितीची आपणास चांगली जाणीव आहे .आपण बळजबरीने हप्ते घेणाऱ्या. फायनान्स कंपन्याच्या मॅनेजर व वसूली अधिकारी ट्रॅकटर ,गाडी ओढणाऱ्या टीम वर तात्काळ. गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत. महिला बचत गटाबद्दल सुध्दा हिच परिस्थिती आहे. अशीच बळजबरीने पठाणी वसूली चालू आहे. याकडे सुद्धा लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा
या मागणीचे निवेदन तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यास राज्यसभेत करण्यास विरोध केला याचा युवासेनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबत निषेधाचे निवेदन गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांना युवा सेनेच्यावतीने देण्यात आले आहे.
यावेळी मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्वीजय बागल ,जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे , युवा सेनेचे मा. ता .प्रमुख सचिन काळे , शिवसेना ता. संघटक संजय शिंदे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे , सतीश बापू निळ शिवसेना नेते संतोष गाणबोटे , आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थीत होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group