करमाळा भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या मुलाखती 17 जुन रोजी संपन्न -सचिन बापु पिसाळ
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी ग्रामीण तालुका कार्यकारणी निवडी संदर्भात मुलाखती 17जुन रोजी घेण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष सचिन बापू पिसाळ, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर यांच्यावतीने भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या मुलाखती विद्यानगर येथील बागल संपर्क कार्यालय येथे संपन्न झाल्या. भाजपचे काम गावागावात घराघरात पोहोचण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले असून भाजपचे काम जोमाने करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे काम करणार असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष सचिन बापू पिसाळ यांनी सांगितले.


