करमाळा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी कन्हैयालाल देवी तर व्हा. चेअरमनपदी महादेव (अण्णा) फंड यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील नागरिकांच्या पसंदीची पहिली बॅंक असणाऱ्या करमाळा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी कन्हैयालाल गिरीधरदास देवी तर व्हाइस चेअरमनपदी महादेव (अण्णा) आजिनाथ फंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या ‘श्री गिरीधरदास देवी सभागृहा’त अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.सदर निवडीचे संचालक मंडळासह विविध स्तरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
