करमाळा तालुका काँग्रेस आय ब्लॉक अध्यक्षपदी प्रतापराव जगताप निवडीचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रदान
करमाळा प्रतिनिधी मुंंबई येथील टिळक भवन महराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय सभागृहामध्ये प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते प्रतापराव जगताप यांना प्रदेश निवडणुक अधिकारी मा.पल्लम राजु तसेच सरचिटणीस मा.देवानंद पवार यांच्या स्वाक्षरीने करमाळा तालुका काँग्रेस आय च्या ब्लाॕक अध्यक्षपदी निवड केलेले अधिकृत पत्र देण्यात आले.यावेळी सोलापुर जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते पाटील उपस्थित होते.
टिळक भवन येथे संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधिऱ्यांची महत्वाची बैठक संपन्न झाली.
गेल्या वर्षभरापुर्वी सोलापुर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांच्या निवडी झाल्या होत्या परंतु बाकीच्या ३-४ तालुका अध्यक्षांच्या निवडीवरुन पेच निर्माण झाला होता.अखेर या वादावरती पडदा पडला असुन सर्व तालुकाध्यक्षांना त्यांच्या आधिकृत निवडीची पत्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते देण्यात आली. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा.मंत्री.बाळासाहेब थोरात,माजी मंत्री नसीम खान, आ.रविंद्रभाऊ धंगेकर,प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे,प्रा.काकासाहेब कुलकर्णी, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते पाटीलसह सर्व तालुकाध्यक्ष यांनी देशाचे माजी गृहमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली.यावेळी काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपले अनुभवासह योग्य मार्गदर्शन मा.शिंदेसाहेब यांनी सर्वांना केले.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
