डिकसळ- कोंढार चिंचोली ब्रिटीशकालीन पुलाची तात्पुरती डागडुजी तातडीने करणे गरजेचे.. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घ्यावी- ॲड.अजित विघ्ने( प्रवक्ता- राष्ट्रवादी काँग्रेस. करमाळा)

करमाळा- प्रतिनिधी सोलापुर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्हयांच्या सिमेवर १५०वर्षापुर्वी ब्रिटीश काळात बांधलेल्या डिकसळ ते कोंढार चिंचोली दरम्यानचे पुलाचा काही भाग पाण्याच्या लाटांमुळे खचलेला असुन यामुळे या पुलावरून होणारी सर्व वहातुक प्रशासनाकडून तातडीने बंद करणेत आली आहे. या ठिकाणांवरून आज काही प्रमाणात दुचाकी वहातुक चालु होती. सदर ठिकाणी जाऊन आज प्रशासनाने दोन्ही बाजुने आडवे चर खोदलेले असुन पोलिस यंत्रणेकडून बॅरीकेट लावलेले आहेत. या रस्त्याने रोज शाळकरी मुले, दवाखान्यातील पेशंट, शेतकऱ्यांचे दुध, भाजीपाला यासह मासे व अन्य वहातुक दिवसभर चालु असते. करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातुन तर रोज जा-ये करणारांची संख्या हजारोंनी आहे. बरीचशी नोकरदार मंडळी तर भिगवण, बारामतीवरून करमाळा तालुक्यात ये जा करण्यासाठी याच पुलाचा रोजचा वापर करतात. त्यामुळे करमाळ्याचे पश्चिम भागातील हा पुल म्हणजे जीवनदायिनी आहे. सदर जुन्या ब्रिटीशकालिन पुलाची मर्यादा संपल्यामुळे येथुन जड वहातुक होऊ नये या करिता सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचना फलक देखिल लावलेले आहेत. तरी देखिल या पुलावरून काही प्रमाणात प्रशासनाला न जुमानता जड वहातुक होताना आढळते. यामुळे दोन्ही बाजुने लोखंडी बॅरिकेट देखिल बसविले आहेत. याशिवाय येथुन नवीन पुल व्हावा याची बऱ्याच दिवसांपासून नागरिकांची मागणी होती. याची दखल माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतली व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचेकडून नवीन पुलासाठी त्यांचे कार्यकाळात महत्वाची मंजुरी देखिल घेतली असुन जुन्या पुलाचे जतन करण्यासाठी देखिल प्रस्ताव मंजुर करून घेतला आहे परंतु नवीन पुलाचे काम पटेल इंजिनियर्स या कॉन्ट्रॅक्टर कडुन अतिशय धीम्या गतीने चालु आहे. नवीन पुलाचे ठिकाणी पाईल्स फांऊडेशन चे काम चालु झाले होते परंतु आज ते देखिल बंद स्वरूपात आहे. मागिल काळात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सत्ताधारी सरकारचे बाहेर राहीले त्यावेळेस उद्भवलेल्या परिस्थितीत काही महाभागांनी या पुलाचे काम कसे रखडेल याबाबत दुष्ट राजकारण केले. पडद्याआडून या पुलाचे बाबत राजकारण केले गेले त्यामुळेच पटेल इंजिनियर्स सारखे कॉन्ट्रॅक्टर शिरजोर झाले व कामाची गती थांबली गेली. या पुलास वाढीव निधी मंजुर करून या ठिकाणचा नवीन पुल लवकरात लवकर साकारणे गरजेचे असुन, जुन्या पुलाची डागडुजी देखिल झाली पाहिजे.आज ज्या ठिकाणी पुलाचा कठडा खचला आहे त्या ठिकाणची डागडुजी तातडीने केल्यास किमान हलकी वहाने तरी या पुलावरून जाऊ शकतात परंतु जर प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास हा पुल कधी कोसळेल हे सांगु शकत नाही. या भागातील नागरिक पुलाचे डागडुजी करीता मदत करण्यासाठी देखिल तयार असुन, प्रशासनाने समन्वय साधुन खचलेला भागाची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी होत आहे. या पुलावरून होणारी तीन व चार चाकी वहानांची वहातुक पुर्णपणे आज बंद केल्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असुन, शाळकरी मुले, तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असणारे पेशंट यांना या पुलाची अत्यंत आवश्यकता भासते. त्यामुळे या कामी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी लागणार आहे. फक्त दोन्ही बाजुला चर खोदई करून आणि वहातुक बंद करून भागणार नसुन जुन्या पुलाचे ठिकठिकाणची डागडुजी तत्परतेने होणे गरजेचे आहे. या करीता आम्ही पश्चिम भागातील शिष्टमंडळ तयार करून वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,सार्व बांधकाम मंत्री यांचेकडे पाठपुरावा करणार असुन,तोपर्यंत सर्व नागरिकांनी सतर्क राहुन काळजी घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन विनंती पश्चिम भागातील युवक नेते ॲड.अजित विघ्ने यांनी केले आहे..


