करमाळा ते कोर्टी रस्त्याचे काम जलदगतीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आनंदकुमार ढेरे यांचा इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा ते कोर्टी रस्याचे काम जलदगतीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे यांनी दिलाआहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की कोर्टी,विहाळ,विट रोशेवाडी या गावातील रस्त्याच्या कडेच्या माणसांच्या घरात घुळ जाते ही बाब तर आहेच त्यामुळे अनेकांना फुफुसाचे आजार ही व्हायला लागले आहेत.आत्ता पावसाळा जवळ आला तरी खुप संथ गतीने चालू आहेत आला पावसाळा रस्त्याची कामे तेवढे तीव्र गतीने होणार नाहीत आसे वाटायला लागले आहे.त्यामुळे ही जर कामे झाली नाहीत अपघात झाले तर त्याला रस्त्याची इनफ्रा कंपनी जबाबदार असणार आहे तसेच कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भात निवेदनही देण्यात येणार आहे. आता रस्त्याच्या कडेला गावाच्या माणसांनी तिव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरत नाही. करमाळ्यात रस्त्याच चाललंय काय ? गेले अनेक दिवस रस्त्याची कामे चालू आहेत असे रस्ते कंपनीकडून सांगण्यात येत आहे.त्या संदर्भात तालुक्यातील अनेक आंदोलने झाली.त्यात रास्ता रोको ही झाले. त्यामध्ये प्रामुख्याने जनशक्तीचे संस्थापक अतुल(भाऊ)खूपसे पाटील, जिल्हापरिषद सदस्य बिभीषणजी आवटे, काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रताप(पप्पू)जगताप,शिवसेना युवासेनाचे नेते समाधानफरतडे यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतीनिधी व अनेक सामाजीक संघटनेनी यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देऊन ही आंदोलने ही केली परंतु इनफ्रा कंपनीकडून तेवढा प्रतिसाद भेटला नाही.गेल्या पावसाळ्यामध्ये रस्त्यात अनेक अपघात झाले आणि त्यात अनेकांनी जीवही गमावले. रस्ता होईल ही पण तोपर्यंत अनेकांची बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता तालुक्यातील जनतेला असं वाटायला लागले की हा रस्ता नसून खोळंबा आहे. एवढी तीव्र लोकप्रतिनिधीने आंदोलने करूनही रस्ता होत नाही ही बाब मात्र दुर्लक्षित करण्यासारखी नाही.त्यामुळे इनफ्रा कंपनीचा बोलवता धनी वेगळा आहे का इनफ्रा कंपनी रस्ता हा विषय शिरीयशली का घेत नाही प्रश्न उपस्थित होत . आशा आहे की भविष्यात तरी रोड ची कामे जलद गतीने होऊन माणसाचे जीव वाचतील. काम जलदगतीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आशी माहीती कृ.उ.बा.स.करमाळाचे संचालक आनंदकुमार ढेरे यांनी दिला आहे.
