Monday, April 21, 2025
Latest:
आरोग्यकरमाळाकृषी

बाप रे ….. करमाळा तालुक्यात घोणस सदृश्य विषारी अळीचे आक्रमण :शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण

 

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात उसावर व वाढलेल्या गवतावर घोणस अळीचा सदृश्य विषारी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वडगाव दक्षिण येथील एका शेतकऱ्याला याचा फटका बसला आहे. तो या घोणस अळीच्या संपर्कात आल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.

अशाच प्रकारची विषारी घोणस अळी केत्तूर येथील शिवाजी पाठक यांच्या उसाच्या शेतात दिसून आली आहे. बेण्यासाठी ऊस तोडत असताना अळी खाली पडली होती. विषारी अळी आपल्या भागातही आली हे समजतात शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पिकावर होत असतानाच आता ऊस आणि वाढलेल्या गवतावर हिरवट पिवळसर रंगाची आळी दिसून आली आहे. या अळीचा पिकावर परिणाम होतोच शिवाय माणसावर ही परिणाम होत आहे. या अळीचा अंगाला स्पर्श झाल्यास अंगाला खाज सुटत आहे तसेच भयंकर वेदनाही होत आहेत व नंतर उलट्या होऊ लागतात तर शरीर बधीर पडून बोलताना जीभ अडखळत आहे. या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच अळी अंगावर येऊ नये याची दक्षता घ्यावी असे करमाळा येथील डॉ.रोहन पाटील यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना हिरवट पिवळसर प्रकारची आळी दिसताच तण नाशकाची फवारणी करावी.तसेच शेतामध्ये काम करताना अंगभर कपडे घालूनच काम करावे.असे आवाहन कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group