आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था स्माईल दातांचा दवाखाना डेंटल केअर यांच्या संयुक्त विद्यमाने २५जानेवारीला करमाळा येथे दातांच्या कवळीचे सवलतीच्या दरात विशेष शिबीर
. करमाळा प्रतिनिधी
डॉ. प्रदीपकुमार (आबा) पाटील यांच्या स्मरणार्थ आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या विद्यमाने स्माईल दातांचा दवाखाना डेंटल केअर, करमाळा यांच्या सहकार्याने दातांच्या कवळी बसविण्याचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर रविवार, दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, शिबीराचे स्थळ जाधव–पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा असे आहे.
या शिबिरामध्ये दातांच्या कवळी बसविण्याची सुविधा ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दातांच्या कवळीची मूळ किंमत २५,००० रुपये असून शिबिराच्या निमित्ताने ही सुविधा केवळ १२,५०० रुपयांत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार दंतोपचार अल्प दरात मिळणार आहेत.
शिबिरामध्ये अनुभवी व तज्ञ दंतचिकित्सक सेवा देणार असून यामध्ये डॉ. अशमान सिंह (B.D.S.), डॉ. प्रविण गायकवाड (M.D.S.) आणि डॉ. सचिन महाबोले (B.D.S.) यांचा समावेश आहे. दातांची तपासणी, योग्य सल्ला व आवश्यक उपचार या शिबिरात करण्यात येणार आहेत.
दातांची कवळी बसवून निरोगी व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगावे, या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी मो. ९९२१७४१५१२ / ७५५९२१४५५१, तसेच फोन (०२१८२) २९९६११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या नियोजनासाठी शितल सर (मो. ७५५९२१४५५१) अभिजीत पाटील (मो. ९४२३६३७३२८) यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमाचा लाभ करमाळा व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


