विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे जनतेने दिले विकासाला प्राधान्य- संजय घोरपडे करमाळ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
करमाळा प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेले अभतपूर्व यश म्हणज जनतेने विकासाला प्राधान्य दिले असे यामधून दिसून येते असे मत संजय घोरपडे यांनी सुभाष चौक येथे राज्यात महायुतीची सत्ता आल्याबद्दल जल्लोष करताना व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ढोल ताशा, फटाके व पेढे वाटून गुलाल उधळून आनंद साजरा केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की करमळा येथील महायुतीचे उमेदवार श्री दिग्विजय बागल यांनीही कमी कालावधीमध्ये चांगली लढत देऊन मोठ्या प्रमाणात मते मिळवलेली आहेत ही बाबी ही उल्लेखनीय आहे पुढील काळामध्ये ही भाजपाचे कार्यकर्ते संघटना असो या येणाऱ्या निवडणुका असो एक दिलाने काम करतील करमाळा शहर व तालुक्यामधील विकास कामे भाजप सरकारच्या काळामध्ये निश्चितपणे सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी सचिन चव्हाण किरण बोकन श्याम सिंधी शशिकांत पवार आदेश कांबळे जितेश कटारिया नरेंद्रसिंह ठाकुर विजयकुमार नागवडे डॉ कुलकर्णी नानासाहेब मोरे शेटफळ, एडवोकेट सुहास कानगुडे दिनेश मडके मनोज कुलकर्णी संतोष कांबळे रेणुका राऊत सौ सुप्रिया कांबळे भाग्यश्री कुलकर्णी नितीन कांबळे शिवनाथ घोलप संतोष कांबळे महेश क्षीरसागर प्रदीप देवी संतोष दोशी मुन्ना हसीजा आधी जण उपस्थित होते.


