Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे १३ वे वार्षिक अधिवेशन करमाळा येथे १ मार्च रोजी आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक-विद्यार्थ्यांचा गुणगौरव

करमाळा प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व करमाळा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे १३ वे वार्षिक अधिवेशन रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी करमाळा येथे होत आहे. विज्ञान विषयातील अद्ययावत घडामोडी, संशोधन व नवतंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक-विद्यार्थ्यांचा गौरव हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.
‘नवीन सूक्ष्मजीव व जैवतंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. प्रवीण देशमुख (विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा) हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासमवेत प्रा. रामदास झोळ यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच ‘इनोव्हेशन, संशोधन व विकास’ या विषयावर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथील संशोधक व प्राध्यापक डॉ. विकास पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात विज्ञान विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा गुणगौरव माननीय आमदार नारायण (आबा) पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई संजय सावंत, महिला प्रदेशाध्यक्ष भाजपा तथा जिल्हा परिषद सदस्य सौ. रश्मीदीदी बागल, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. गणेश चिवटे, तसेच करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शंभूराजे जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
यावर्षीचा ‘विज्ञान विषयातील जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ विज्ञान शिक्षक शिवाजी रामलिंग चापले यांना त्यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विज्ञान विषयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका शाळेला ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
या अधिवेशनास जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. सचिन जगताप, करमाळा गटशिक्षणाधिकारी श्री. नितीन कदम, अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर बुधाराम, सोलापूर जिल्हा परिषदेचे विज्ञान पर्यवेक्षक श्री. अनिल बनसोडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज्य विज्ञान मंडळाचे संचालक श्री. लक्ष्मीप्रसाद मोहिते, अध्यक्ष श्री. संजय जवंजाळ, सचिव नुरअहमद कारंजे व परीक्षा प्रमुख संतोष दोडयाळ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
अधिवेशनास सोलापूर जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करमाळा तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय भस्मे व सचिव श्री. संदीप पुजारी तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!