वाशिंबे येथे जागतिक महिला दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी वाशिंबे जि.प.शाळा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ यांच्या हस्ते करुन रांगोळी, खो खो ,संगित खुर्ची,तसेच प्रत्येक महिलांनी आपले विचार व्यक्त केले.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांची उत्तुंग भरारी त्यांच्या कर्तुत्वाला देऊ आपण उभारी सरपंच मनिषाताई झोळ महिला दिनाच्या निमित्ताने विश्वास दिला. यावेळी वाशिंबे विविध कार्यक्रम कार्यकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन स्वाती जाधव, ग्रामपंचायत सदस्या विजया झोळ,वंदनाताई झोळ,सविता भोईटे, जयश्री झोप,शारदाबाई पवार,कुलकर्णी तसेच जि.प.शिक्षका उपस्थित होत्या.
