Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 5 सिझेरियन शस्त्रक्रिया – डॉ.राहुल कोळेकर

करमाळा प्रतिनिधी
करमाळा प्रतिनिधी माढा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सीझरची सुविधा 23 जून 2020 पासून सुरू करण्यात आली होती. मार्च 2021 पर्यंत एकूण 162 महिलांचे सीझर करण्यात आले . मे 2021मध्ये कोरोणा प्रतिबंधक उपाय योजनामुळे सिझेरियन विभाग बंद ठेवण्यात आला होता. कोरोणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जूनमध्ये पुन्हा सिझेरियन विभाग सुरू करण्यात आला. 30 नोव्हेंबर 2021 अखेर उपजिल्हा रुग्णालयात 198 महिलांचे सीझर करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर 2021 या एकाच दिवशी उपजिल्हा रुग्णालयात 5 सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असल्याची माहिती करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल कोळेकर यांनी दिली.
काल 30 नोव्हेंबर 2021 रोजी सौ. प्रतीक्षा श्रीकांत आढाव- पोथरे ,सौ संगीता संजय होले – लोणी , ता. कर्जत, सौ.आरती शुभम आरडे – शेडशिंगे तालुका माढा, सौ. पल्लवी गणेश कदम – उमरड , सौ.सुनिता लहू कांबळे – मोरवड या 5 महिलांचे सिझर यशस्वीपणे करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्त्रीरोग तज्ञ डॉ.नीलेश मोटे डॉ. कविता कांबळे, डॉ. आफ्रीन बागवान, डॉ. स्मिता बंडगर, भुलरोग तज्ञ डॉ. अंकुश पवार ,बाल रोग तज्ञ डॉ. विद्या सारंगकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भोसले , डॉ. अविनाश राऊत, श्रीमती छाया शिंदे ,श्रीमती सरोदे ( अधिपरिचारिका यांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया पार पडत आहेत.
सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीला एखादे सिझर करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येत होता. हा खर्च करणे त्या कुटुंबाला शक्य नव्हते. म्हणून खास गोरगरीब जनतेसाठी उपजिल्हा रुग्णालयात सिझर ची सुविधा उपलब्ध केलेली असून या सुविधेचा लाभ तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा. असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

चौकट …
उपजिल्हा रुग्णालयात ऑक्टोबर 2021 पासून पूर्णवेळ भूलतज्ञांची नेमणूक – डॉ. अमोल डुकरे (वैद्यकीय अधीक्षक)
उपजिल्हा रुग्णालयातील सेवासुविधा तसेच भूलतज्ञ उपलब्ध नसणे याबाबतीत वेगवेगळ्या चर्चा गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे म्हणाले की, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी भुलरोग तज्ञ मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह आम्ही पाठपुरावा केलेला होता. त्याला यश आलेले असून डॉ. तेजस्विनी आवळे या भुलरोग प्रज्ञा म्हणून ऑक्टोबर मध्ये करमाळा उपजिल्हा रुग्णालयात हजर झालेल्या आहेत .सध्या त्या बालसंगोपन रजेवर असल्यामुळे परांडा येथील भूलरोग तज्ञ डॉ. अंकुश पवार यांच्या मदतीने सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अफवावरती विश्वास न ठेवता विश्वासाने उपजिल्हा रुग्णालयात यावे आम्ही त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी सक्षम आहोत.
*अधिक माहितीसाठी संपर्क*…
*डॉ. राहुल कोळेकर* – 9970767155( *वैद्यकीय अधिकारी*)

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group