वांगी 1 येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ लहू श्रीपती कदम विद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
वांगी प्रतिनिधी
वांगी 1 येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ लहू श्रीपती कदम विद्यालय येथे शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला . यावेळी सकाळी प्रार्थने पासूनच शाळेचे सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी पाहिले.
इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी इतर वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम केले. अध्यापनाचा अनुभव घेता येत असल्याने इयत्ता 10 वी चे विद्यार्थी व दररोजच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांकडून अध्यापन होत असल्याने इतर विद्यार्थी आनंदी दिसत होते.
सभेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी घेतलेल्या अध्ययन अध्यापनाचे अनुभव व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यामधील मुख्याध्यापक म्हणून भूमिका बजावणारी कु. ऐश्वर्या गायकवाड हिने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय हेंद्रे, सयाजीराव जाधवर, सचिन खाडे, आप्पा दोलतडे, तानाजी खरात, सुवर्णा वैद्य, केशव भूतकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी डाखले हिने तर आभाप्रदर्शन अंकिता सांगवे या विद्यार्थीनीने केले.
