Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

राजुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मिनी जनता दरबार संप्पन

राजुरी  प्रतिनिधी करमाळ्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय समीरजी मानेसाहेब यांनी राजुरीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली यानंतर E- KYC तसेच मतदान ओळखपत्र आधारला लिंक करण्याच्या कॅम्प ला भेट दिली यावेळी गावातील नागरिकांचे तहसील कार्यालय संबंधित असणारे प्रश्न असल्याची माहिती दिल्यानंतर त्याच ठिकाणी बसून बऱ्याच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.*
*रेशनकार्ड च्या संदर्भात खऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त किंवा विनामूल्य धान्य न मिळणाच्या तक्रारी दिसून आल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन केले.* स्वेच्छेने राशन धान्य सोडणाऱ्या नवनाथ गुरुदेव गजानन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
*शिक्षक दिनाच्या निमित्ताने राजुरीतील जिल्हापरिषद शाळेला भेट देऊन सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या BLO असणाऱ्या शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच सर्वच शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.* यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे,नायब तहसीलदार बदे, कृषी सहाय्यक ठोंबरे, तलाठी अजय चव्हाण, ग्रामसेवक गलांडे,आर आर बापू साखरे, राजेंद्र भोसले, नवनाथ दुरंदे, नानासाहेब साखरे,बंडू टापरे,श्रीकांत साखरे, कल्याण दुरंदे,दत्तात्रय दुरंदे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group