करमाळा

गुळसडी गावचे अतिक्रमण काढण्यासाठी बळीराम यादव नानासाहेब भंडारे यांचा जन आंदोलन छेडण्याचा इशारा

 .करमाळा प्रतिनिधी गुळसडी गावाला अतिक्रमानाचा मोठा विळखा पडला असून स्थानिक पुढाऱ्यांचा आशीर्वाद असुन अधिकाऱ्याची मर्जी राखुन सध्या रामभरोसे कारभार चालू आहे. याकडे अधिकाऱ्याने गांभिर्याने ताबडतोब लक्ष देऊन खाजगी  जागेवर असणारेअतिक्रमण न काढल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराम यादव नानासाहेब भंडारे यांनी दिला आहे. गुळसुडी गावामध्ये पुढाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी व आपले हित संबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून विकासाला आडकाठी आणणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी व गावाचे विकासासाठी गुरसळी गावचे अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असुन प्रशासनाने ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group