Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळा

युवा उद्योजक बिभिषण हुलगेची पोंधवडी ते चाकण उद्योगाची यशोगाथा

काल परवा पुण्यावरून भिमाशंकर कडे जाताना चाकण एमआयडिसी येथे आमच्या आबासाहेब ठोंबरे यांचा भाच्चा आपल्या पोंधवडी गावचा युवक बिभिषण हुलगे याचे पवनसुत इजिनियरिंग वर्क्स ला भेट दिली… बिभिषणचा पोंधवडी ते चाकण पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.. पोंधवडी सारख्या अगदी छोट्याशा खेड्यातील हा मुलगा, शिक्षण कमी असुनही आपल्या मेहनतीच्या जोरावर यशोशिखरावर विराजमान आहे. पोंधवडीला ऊजाड माळरानावर जेमतेम शेती, आईवडील शेतकरी… घरात मार्गदर्शन करायला कोणी नाही .. स्वतः पोलिस भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन असलेला बिभिषण भरतीला जातो परंतु भरती होत नाही … निराश, हताश न होता परिस्थितीवर मात करायचं ठरवतो.. थोरले बंधु नानाचा पाठींबा आणि मार्गदर्शन मिळते.. चाकण एम आय डि सी मधे प्रथमतः मोलमजुरी करायला गेलेल्या थोरल्या बंधुबरोबर स्वतःही मजुरी करायला सुरुवात होते… सुरुवातीला कठीण असणारे काम अनुभवातुन सोपे होत जाते.. शिक्षण कमी तरी देखिल इंजिनिअरिंग मधील बारकावे शोधुन प्रत्येक जॉबचे निरिक्षण करून अथकपणे काम केले… अगदी चार पाच वर्षात हा पठ्ठ्या इतका तरबेज झाला की.. चाकण एमआयडिसी येथे स्वतःचा पवनसुत इजिं.. वर्कर्स या नावाने स्वतःचा व्यवसाय चालु केला, आज त्याच्याकडे जवळपास नऊ कामगार आहेत… मी स्वतः पाहीले आणि थक्क झालो.. आज त्याचेकडे अनेक कंपन्यांची कामे आहेत त्यामधे प्रामुख्याने टाटा, महिंद्रा या कंपन्याबरोबरच जॉन डिअर सारख्या नामांकीत कंपनीचे जॉब तयार करण्याचे देखिल काम होत आहे.. बंधुचे देखिल स्वतंत्र व्यवसाय आहेत.. परंतु बिभिषण याने आज त्याचे व्यवसायात उंच गगनभरारी घेतली आहे… खरं तर ही यशोगाथा आहे एका ग्रामिण भागातील एका गरीब सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाची….. बिभिषण रिअली हॅटस् ऑफ यु…. congratulations for your better future!..ॲड अजित विघ्ने केत्तुर ता.करमाळा जि.सोलापुर
👍👍👍👍👍

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group