Friday, April 25, 2025
Latest:
सकारात्मक

आंतरवली सराटी येथे मनोज जंरागेशी भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षणाबरोबर शैक्षणिक संस्थेत इतर समाजाप्रमाणेच शैक्षणिक सवलत मिळण्यासाठी प्रा.रामदास झोळ यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी. आंतरवली सराटी येथे मराठा योध्दा मनोज जंरागेशी भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षणाबरोबर शैक्षणिक संस्थेत इतर समाजाप्रमाणेच शैक्षणिक सवलत मिळण्याची मागणी राज्यसरकारकडे करुन मराठा समाजातील विद्यार्थ्याना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आरक्षणाशिवाय मराठा समाजाची विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक सवलती आरक्षणाशिवाय लागू केल्यास खऱ्या अर्थाने या समाजाचा सर्वांगीण विकास होईल.

महाराष्ट्र राज्यांमध्ये इतर  समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वसतिगृहासाठी खूप सवलती देत आहे माझ्या कॉलेजमध्ये कशी असते. ओपन कॅटेगिरी साठी ९४०००/-रुपये तर रिर्झव्हला २०००/- रुपये आहे. ज्यांना कुठलेही शैक्षणिक आरक्षण नाही, तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न २५००००/-पेक्षा कमी आहे, अशा मराठा समाजातील लोकांना शैक्षणिक सवलती देणे गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजातील गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल . त्याच पद्धतीने वस्तीगृहासाठी ही धनगर समाजालाआदिवाशीप्रमाणे आरक्षणा देता आले नाही तर सन २०१९ सारखा जी. आर. काढुन शैक्षणिक सोयी सवलती देण्यात यावी. EWS योजनेअंतर्गत राज्यसरकार पन्नास टक्के रक्कम देते, केंद्र सरकार खरच सकारात्मक असेल तर केद्र सरकारने पन्नास टक्के द्याव्यात. ईतर समाजाला साठ टक्के देत मराठा समाजाला पन्नास टक्के देण्यात येऊन समाजास न्याय द्यावा. वसतीगृह भत्ता इतर समाजबांधवाप्रमाणे द्यावा. आज महाराष्ट्रात वैद्यकिय शिक्षणात एम. बी. बी. एस., बी. एच. एम. एस. ,बी. एच. एस., नर्सिग फिजोथेरपीला सरकारने सरकारी महाविद्यालयांना EWS लागु केले आहे. हे आरक्षण खाजगी महाविद्यालयांना ही करून फार्मसी, नर्सिंग, इंजिनीरिंग व आर्किटेक्चर कोर्सलाही लागू केले पाहिजे, त्याने जागा वाढून या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे . ओबीसी, ओपन समाज ईतर समाजाप्रमाणे आहेत, शासनाने महाराष्ट्रात ओपन कॅटेगिरी ला ६०५ अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते तर ईतर समाजाला १६०० अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते.त्याप्रमाणे आरक्षणाशिवाय सवलती लागु करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाची मागणी मान्य होणारच आहे, पण त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलत मिळाली तर नक्कीच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य्य उज्वल होणार असल्याचे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group