वाशिंबे परिसरात दमदार पाऊस शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण
वाशिंबे प्रतिनीधी.. पावसाळा संपत आला तरी दमदार पाऊस होत नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता,पाझर तलावातही म्हणावा असा पाणीसाठा अद्यापही झाला नाही. गेल्या काही वर्षापासून गणपती काळात समाधानकारक पाऊस होत असल्याने यावर्षीही त्याचा प्रत्यय आला.दरम्यान गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण व ऊन पाऊस खेळ चालू होता परंतू शेतकरी दमदार पाऊसाच्या प्रतिक्षेत होता.रात्री ९ सुमारास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस सुरू झाला.दिड ते २ तास मुसळधार झालेल्या पाऊसाने ओढे नाले वाहु लागले.या पावसाने सखल भागातून पाणी वाहिले. तर बहुतेक ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आले.सर्वत्र शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
