Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेच्या, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात SSC आणि CBSE विभागाच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक क्रीडा महोत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडला. याप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब ,संस्थेच्या सचिव सौ.माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ. विशाल बाबर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

मानवी जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यात तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, आत्मविश्वास,खिलाडू वृत्ती इत्यादी गुण विकसित करण्याच्या दृष्टीने ” खेळ” महत्वाची भूमिका बजावतो. हाच उद्देश लक्षात घेऊन सालाबादप्रमाणे या वर्षी देखील क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खेळाच्या विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रसंगाचे औचित्य साधून दत्तकला संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास झोळ सरांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना , अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य ओळखून विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे,असे सांगितले. संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ मॅडम यांनीही मुलांनी मोबाईलच्या आभासी खेळापासून दूर राहून मैदानी खेळ खेळावेत.आणि आपला सर्वांगीण विकास साधावा असा संदेश दिला.
सर्व मान्यवरांसहित या क्रीडा महोत्सवाच्या आयोजक ,दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर आणि CBSE च्या प्राचार्या डॉ. नंदा ताटे मॅडम, SSC विभाग आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव मॅडम, सर्व शिक्षक, प्रशिक्षक, पंच आदींच्या उपस्थितीत हा महोत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्योती झोरे व सूत्रसंचालन प्रा.धर्मेंद्र धेंडे यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group