करमाळा

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान


करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाज भूषण पुरस्कार 2025 शिर्डी येथे श्री बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला. यावेळी अभिनेत्री चित्रा दीक्षित, अभिनेत्री वंदना गव्हाणे आणि अध्यक्ष तथा दिग्दर्शक सुदाम संसारे सर यांच्या हस्ते शिर्डी येथे सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गेली 27 वर्षापासून करमाळा येथे संगीत आणि योगा च्या माध्यमातून समाजसेवाआणि देशसेवा करीत आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून विशारद, अलंकार आणि पीएचडी झाले आहेत . राज्यात आणि राज्याच्या बाहेर ही त्यांचे संगीत आणि योगा च्या माध्यमातून कार्य सुरू आहे. संगीत व योगाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्याबद्दल अनेक त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. श्री बाळासाहेब नरारे सर यांची जिद्द ,चिकाटी, देश हित आणि समाजसेवा लक्षात घेऊन आज त्यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार साईच्या पवित्र भूमीत “साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025” शिर्डी येथे देण्यात आला… अध्यात्म आणि योगा च्या कार्याबद्दल सौ रेशमा जाधव यांना हि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, डॉ कविता कांबळे, डॉ श्रद्धा जवंजाळ, समाजसेवक श्रेणिक भाई खाटेर, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश मडके, कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव शिवकन्या नरारे तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवार करमाळा, सुरताल संगीत विद्यालय परिवार यांच्या वतीने ही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!