कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांची 71 वी जयंती निमित्त आरोग्य शिबिर, फळे वाटप कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी
कामगार नेते, हमाल पंचायत चे संस्थापक कै.सुभाष आण्णा सावंत यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आज मार्केट यार्ड, हमाल भवन येथे आयोजित केले होते, या आरोग्य शिबिराचे उदघाटन डाॅ संजय कोग्रेकर , उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डाॅ अमोल डुकरे यांचे हस्ते करण्यात आले असून यामध्ये 371 रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती हमाल पंचायत चे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य अॅड राहुल सावंत यांनी दिली. यावेळी डाॅ.राहुल कोळेकर. डाॅ रोहन पाटील , डॉ. निलेश मोटे , डाॅ हर्षद माळवदकर, डाॅ रवीकिरण पवार, डाॅ बाबूराव लावंड, डाॅ हरीदास केवारे , डाॅ. विशाल शेटे. डॉ. खोसे, डॉ. दिपक केवारे, डॉ. संकेत सावंत, गजानन विभुते, अनिकेत कोतकर, वीरू सोळंके , मारुती डुककवाड, श्रीमती रेखा पवार आदी जणांनी रूग्णाची तपासणी केली. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना गणेश करे पाटील म्हणाले की, ज्या कष्टकरी व हमाल तोलार बांधवांच्या प्रगतीसाठी आण्णांनी उभे आयुष्य वेचले त्यांच्या नंतरही ॲड राहुल सावंत यांनी ही हमाल तोलार बांधवांसाठी या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून हमाल बांधव यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत हे निश्चित अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गगार यावेळी त्यांनी काढले. तसेच स्व. सुभाष आण्णा नंतर ज्या विश्वासाने हमाल बांधवांनी ऍड राहुल सावंत यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती ते देखील हमाल तोलार बांधवांच्या अडीअडचणींची खंबीरपणे सोडवणूक करत आहेत.
आज सकाळी नऊ वाजता आमदार संजय मामा शिंदे यांचे हस्ते स्व. सुभाष अण्णांच्या प्रतिमेचे पूजन हमाल भवन, करमाळा येथे करण्यात आले, यावेळी मा. जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुनील बापु सावंत, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जाधव, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, जिल्हा परिषदेचे जगदाळे, भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे , नगरसेवक संजय सावंत करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार , नगरसेवक राजू आवाड, नगरसेवक गोविंद किरवे. संचालक शशिकांत केकाण, सरपंच उदय ढेरे, पत्रकार विवेक येवले आदी जणांच्या उपस्थित झाले. यावेळी जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळे व पोषक आहार अंडी वाटण्यात आले तसेच गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटण्यात आला.
सदर कार्यक्रमास मकाई चे अध्यक्ष दिग्विजय बागल,बाजार समितीचे चेअरमन प्रा. शिवाजीराव बंडगर, व्हा. चेअरमन चिंतामणी दादा जगताप, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, मा. सभापती गहिनीनाथ ननवरे, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक अतुल फंड, नगरसेवक अँड. नवनाथ राखुंडे, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, महादेव फंड, मा. नगरसेवक राहुल जगताप, खलील मुलाणी, सुजित तात्या बागल, देवानंद बागल, राजेंद्र बागल, राजाभाऊ बागल, ॲड बलवंत राऊत, अँड बाबूराव हिरडे, अँड प्रशांत बागल, ॲड सचिन लोंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, पत्रकार अशोक नरसाळे , पत्रकार आलिम शेख, पत्रकार अशपाक सय्यद, व्यापारी असोसिएशन चे चेअरमन विजय दोशी, विलास जाधव, मदन काका देवी, गोरख ढेरे, देवा लोंढे, सचिन गायकवाड यांनी भेट दिली.
आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे मा.संचालक विठ्ठल रासकर, मा, बाळासाहेब गोडसे, संचालक वालचंद रोडगे, उपाध्यक्ष गजानन गावडे, ज्ञानेश्वर गोसावी, भीमराव लोंढे , सोपान बारवकर, शिवाजी आवटे, सुनील शेळके, शकील शेख, सचिन चांदगुडे, महादेव कांबळे, गणेश कांबळे, दिनेश माने, राजेंद्र कांबळे, महंमद पठाण, सतीश खंडागळे, कोंडीराम ससाणे,बापु उबाळे ,समाधान सुरवसे ,सागर सामसे, बंडू अडसुळ, बापु नलवडे, दादा सुरवसे ,आकाश करकुटे ,भैय्या सुरवसे ,मार्तंड सुरवसे, शाम महाडिक, विशाल रासकर, गणेश सावळकर, अंकुश ढवळे, संतोष कुकडे, शरद यादव, नागेश उबाळे ,मजहर नालबंद ,आनंद रोडे, वाजीद शेख ,नागेश सुर्यवंशी, शुभम बनकर, शरद वाडेकर, दिनेश देशमाने आदी जणांनी परिश्रम घेतले
. ..
