माजी सैनिकांचा सत्कार नवीन कार्य करण्यास प्रेरणा देतो निवृत्त सुभेदार-शिवाजी भंडारे
करमाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आजी माजी सैनिक व वीर माता पिता यांच्या सन्मान सोहळा सध्या आयोजित करण्यात येत आहे. काल 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शेलगाव क ग्रामपंचायतीच्या वतीने आजी-माजी सैनिकांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्री अशोक काटोळे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस श्री शिवाजी भंडारे बोलत होते.
या प्रसंगी माजी सैनिक श्री भिमराव शिंदे, श्री शंकर शिंदे ,श्री धनंजय जाधव श्री चांदने मेजर , सुभेदार श्री शिवाजी भंडारे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शन करताना निवृत्त सुभेदार शिवाजी भंडारे म्हणाले की 1977 साली मी भारतीय सैन्यामध्ये दाखल झालो व 2005 मध्ये निवृत्त झालो. यादरम्यान च्या कालावधीमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज केल्यामुळे शेवटी फादर ऑफ आर्मी समजल्या जाणाऱ्या सुभेदार मेजर पदावरून मी निवृत्त झालो .20 वर्ष शूटिंग मध्ये मला चॅम्पियनशीप मिळाली होती.या कामाची दखल घेऊन तत्कालीन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांचे अंगरक्षक म्हणूनही काम करण्याची संधी मला मिळाली होती .
असे असले तरी प्रत्यक्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र मिलिटरीचे शिस्तबद्ध जीवन आणि सिव्हील जीवन यामधील फरक अस्वस्थ करून गेला. या सिव्हिल समाजाशी जोडून घेण्यासाठी मला 5 वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर त्याच उमेदीने आजही समाजोपयोगी कार्यक्रम/ उपक्रम राबवत आहे .आपण जे सन्मान ,सत्कार करता त्यामुळे नव्याने समाजोपयोगी कार्यक्रम करण्याची नवी ऊर्जा मनामध्ये निर्माण होते असे ते म्हणाले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राहुल कुकडे, आत्माराम वीर, प्रविण जगताप यांचे बरोबरच लखन ढावरे ,धर्मराज शिंदे या ग्रामपंचायत सदस्य बरोबरच डॉ. विकास वीर श्री दत्तात्रेय ननवरे ,श्री श्रीधर पाटील , ग्रामसेवक खाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार ग्रामसेवक खाडे यांनी मानले. अध्यक्षीय मार्गदर्शन सरपंच अशोक काटुळे यांनी केले.
