करमाळा तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीना जलजीवन मिशन योजनेत अंतर्गत 2 कोटी 82 लाख निधी मंजूर-माजी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन योजने अंतर्गत 5 ग्रामपंचायतींना 2 कोटी 82 लाख 25 हजार 373 रुपये निधी मंजुरकरण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली आहे.जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तांत्रिक मंजुरीचे आदेश जिल्हा परिषद सोलापूर यांनी काढला आहे.याबाबत अधिक माहीती देताना माजी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले की,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत काम करत असताना करमाळा तालुक्यातील घोटी 31 लाख 92 हजार 689,निमगाव (ह) 1 कोटी 15 लाख 27 हजार 473 रुपये, म्हसेवाडी 52 लाख 73 हजार 997, गोयेगाव 28 लाख 89 हजार 855 तर हिवरवाडीसाठी 53 लाख 41 हजार 359 रुपयाचा निधी मंजुरीचे तांत्रिक आदेश प्राप्त झाले असून एकूण 2 कोटी 82 लाख 25 हजार 373 रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.पाथुर्डी, जेऊरवाडी ,शेटफळ, वांगी नं 1, वांगी नं. 2 ,चिखलठाण,केम या 7 ग्रामपंचायतींना सुधारित इस्टिमेट नुसार लवकरच तांत्रिक मंजुरी दिली जाणार आहे.
चौकट.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचे श्रेय करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे घेत आहेत.
तर आमदार शिंदे यांनी स्वत च्या कामाचे श्रेय घ्यावे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केले आहे .
