Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मराठा बांधवांना आरक्षण मिळावे जालना हल्ल्याच्या निषेधार्थ आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांचा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा

करमाळा प्रतिनिधी  जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानूष लाठीचाराचा करमाळा मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून आरक्षण मिळावे, म्हणून आंतरवली समाज बांधव माता भगिनींवर जो अमानुष भ्याड लाठीहल्ला निषेध झाला. त्याचा काही दिवसांपासून मराठा व बहुजन समाज करत आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी बस जाळ्यात आल्या तर अनेक गावे शहरे बंद करण्यात आले. करमाळा बुधवार ६ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज करमाळा येथे भव्य विराट निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक लहान मुले-मुली महिला संघटना पक्षानी आपला पाठिंबा जाहीर करून निषेध व्यक्त केला.रोशेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत असलेले करमाळा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात इतिहास नोंद करून घ्यावी असा निर्णय यशपाल कांबळे यांनी घेतला आहे. यशपाल कांबळे हे सामाजिक क्षेत्रात आपले चुलते बहुजन नेते नागेश दादा कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली गेल्या अनेक वर्षा पासून समाजिक बांधिलकी जपत राजकारण कमी पण समाजकार्य जास्त असा वसा ठेवत आपले समाजकार्य करत आहेत. डिसेंबर २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले असता.अजून तीनहुन अधिक वर्ष काम पाहणार होते. आपण समाजाचे काय तरी देण लागतो या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत असताना आज त्या मराठा समाजा साठी ज्या प्रमाणे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी बहुजन समाजासाठी आपल्या पदाचा व आपल्या परिवाराचा विचार न करता. निस्वार्थी पणे फक्त समाजकार्य केले तेच कार्य पुढे नेण्याचे काम आज यशपाल कांबळे करत आहेत. आर पी  आय युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असुन मराठा बांधवांना पाठिंबा देत रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा ग्रामसेवक व तहसिलदार यांच्या कडे देत आपले मराठा समाजाला आरक्षणाचे समर्थन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group