करमाळासकारात्मक

वरीष्ठ न्यायालयास मान्यता मिळवून दिल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांचा वकील संघाकडून सन्मान

करमाळा प्रतिनिधी : 
करमाळा वकील संघाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू,असे अश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले. आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा येथे वरीष्ठ न्यायालय मिळवून देण्यासाठी जी मदत केली, त्यामुळे करमाळा वकील संघाच्यावतीने आ.शिंदे यांचा सन्मान केला. त्यावेळी आ.शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले की..मला काम करण्याची आवड आहे. त्यातूनच वेगवेगळी कामे करतो, काम करणे ही माजी जबाबदारी आहे. वकील संघाच्या गृह निर्माण संस्थेच्या कामास निश्चितच मदत करेल असे ही आ. शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.प्रमोद जाधव यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचा हार, फेटा घालून करमाळा वकील संघाच्या वतीने सन्मान केला.यावेळी करमाळा वकील संघाचे ॲड. सविता शिंदे, ॲड.डाॅ. बाबूराव हिरडे, ॲड. राजेश दिवाण, ॲड.राहूल सावंत, ॲड. नवनाथ राखुंडे. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विकास जरांडे,उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, ॲड. एन.डी. रोकडे यांची भाषणे झाली. प्रास्तावीक ॲड. योगेश शिंपी यांनी केले तर सुत्रसंचालन ॲड. अजित विघ्ने यांनी केले.
error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group