ब्राह्मण महासंघ जगदंबादेवी अन्नछत्र मंडळ श्री देवीचामाळ ग्रामस्थ यांच्यावतीने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन -बाळासाहेब होसिंग
करमाळा प्रतिनिधी 22 जानेवारी. रोजी आयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीदेवीचा माळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन ब्राह्मण महासंघ जगदंबा देवी अन्नछत्र मंडळ श्रीदेवीचामाळ ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी दिली आहे. श्रीदेवीचामाळ येथेश्रीराम प्राणप्रतिष्ठानच्या निमित्ताने श्री रामाच्या मूर्तीला सकाळी 11 ते साडेबारापर्यंत अभिषेक तीन ते पाच यावेळी श्रीराम मूर्तीची मिरवणूक सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये दीपोत्सव सायंकाळी साडेसहा वाजता सपना ताई साखरे वीर यांचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.मिरवणुक मार्गी घरासमोर रांगोळी काढुन भगवा झेंडा लावुन श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्वागत करावे असे आवाहन बाळासाहेब होसिंग श्रीदेवीचामाळ ग्रामस्थ यांनी केले आहे.
