आ. संजयमामा शिंदे यांच्या मागणीला यश… सोलापूर जिल्ह्याचे शेततळ्यासाठी चे प्रलंबित १२ कोटींचे अनुदान मिळाले…
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील शासनाच्या’ मागेल त्याला शेततळे’ या योजनेतील करमाळा तालुक्यातील ११० प्रस्तावांसह सोलापूर जिल्ह्यातीत एकूण ३३७४ शेततळ्यांचे प्रस्तावाचे प्रलंबित थकीत असलेले एकूण १२ कोटी रुपये अनुदान त्वरीत मिळावे अशी मागणी करमाळ्याचे आ .संजयमामा शिंदे यांनी राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांची मुंबई येथे भेट घेवून चर्चा करून लेखी निवेदनाव्दारे मार्च 2021 मध्ये केली होती .
आ. शिंदे यांनी केलेल्या मागणीला यश आलेले असून सोलापूर जिल्ह्यातील 3374 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 48 लाख रुपयांची आवश्यकता होती त्यापैकी 4 कोटी 20 लाख रुपये अनुदान यापूर्वीच मिळालेले होते. शासनाकडे बाकी असलेले 11 कोटी 36 लाख रुपयाचे अनुदान सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याची माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
करमाळा तालुक्यासाठी 3 कोटी 93 लाख 431 रुपयाचे अनुदान वितरित केले जाणार आहे .त्याच बरोबर दक्षिण सोलापूर, मोहोळ ,अक्कलकोट ,बार्शी ,माढा ,पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रलंबित शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आमदार शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे
