भाजपमध्ये चला मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलतो’ असे म्हणत बागल गटाला धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली ॲाफर
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याला सध्या सक्षम नेतृत्व नसून जिल्ह्याचा बर्मुडा झाला आहे, असे म्हणतानाच ‘तुम्ही आता ऐका आणि भाजपमध्ये या’, अशी खुली ऑफर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बागल गटाला दिली आहे. करमाळा येथे लोकनेते स्व. दिगंबर बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सवात ते शनिवारी बोलत होते .यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्व. दिगंबरराव बागल मामा मोहिते-पाटील परिवाराच्या जिव्हाळ्याच्या आठवणीच्या स्नेहसंबंधाना उजाळा दिला. हे सांगतानाच एक उदाहरण देत सोलापूर जिल्ह्याचा सध्या बर्मुडा झाला असून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आता पुन्हा सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आपल्या पिढीवर जबाबदारी वाढली असून आता विचार करण्याची गरज आहे. यावेळी विक्रांत पाटीलही मंचावर होते. त्यांना उद्देशून ‘तुमचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी ठरणार?’ असे ते म्हणाले.बागल यांच्याबाबत बोलताना त्यांनी ‘फक्त माझीच नाही तर तुमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे. तुम्ही भाजपमध्ये या. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलतो’, असे म्हणत बागल गटाला त्यांनी एकप्रकारे ऑफरचं दिली आहे. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बाळराजे पाटील, राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, प्रणव परिचारक, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, गौरव कोलते, पृथ्वीराज माने, बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, आदिनाथचे अध्यक्ष धन॔जय डोंगरे, उपसभापती चिंतामणी जगताप, अमरजीत साळुंखे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आदी उपस्थित होते.