कामगार नेते स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी :- कामगार नेते, माजी अध्यक्ष व संस्थापक हमाल पंचायत करमाळा, माजी संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना, माजी सदस्य जिल्हा परिषद स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या 11 व्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड राहुल सावंत यांनी दिली आहे . सदर कार्यक्रमांमध्ये गुरूवारी , दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दु. 12 या वेळेत ह.भ.प. कबीर अत्तार महाराज यांचे हरीकीर्तन होईल आणि दु. 12 वा. स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांचे प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तसेच स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावेळी ” भव्य रक्तदान शिबीर ” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सकाळी 9 वा. ते 4 वा. या वेळेत केले आहे. प्रत्येक रक्तदात्याला भेट स्वरूपात पाण्याचा जाआर देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक करमाळा तालुका हमाल पंचायत,करमाळा छ.शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली,करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सावंत गल्ली, मारुती मंदिर जवळ, करमाळा येथे होणार आहे


