करमाळा

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट करमाळाच्या The King GSI दहीहंडी संघाची श्रीमान रायगडवर छत्रपती समोर 2025 ची पहिली सलामी

करमाळा प्रतिनिधी : पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी दि 11 ऑगस्ट 2025 रोज श्रीमान रायगड वर श्री छत्रपती शिवाजी महाराजांसमोर करमाळा शहरातील प्रा निकत सरांच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मधील The King GSI दहीहंडी संघाची पहिली सलामी देऊन एक आदर्श उभा केला. करमाळा शहरात पहिल्यांचा दहीहंडी संघ तयार करून मागील 2-3 वर्ष शहरांत खूप चांगल्या पद्धतीने दरवर्षी चांगल्या प्रकारे प्रदर्शन करत असतात. सोबत यावर्षी श्रीमान रायगड येथे जाऊन त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर थर देऊन पहिली सलामी दिली. यामुळे मुलांच्या मध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह निर्माण केला. या संघाची सर्व तयारी आणि सरावाचा नारळ फोडून प्रा डॉ निकत सरांनी मागील 15 दिवासापूर्वी सराव करत होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!