Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात किंवा ग्रामसभेत कोणताही गोंधळ झाला नाही- सरपंच. नवनाथ गायकवाड

करमाळा प्रतिनिधी पोमलवाडी ता- करमाळा येथे काल रोजी२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला असुन, ग्रामसभेत देखिल कोणालाही मारहाण झालेली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर गावातील काही लोकांचे वैयक्तिक मतभेदांवरून किरकोळ स्वरूपाचे वादविवाद झाले असतील, त्याचा विपर्यास करून गावाला बदनाम करण्याचे षडयंत्र गावातील काही लोक जाणुन बुजुन करीत असुन, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात किंवा ग्रामसभेत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.. याबाबतचा खुलासा सरपंच. नवनाथ गायकवाड यांनी केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group